Search

देआसराचं ‘मिशन 1 मिलियन’, घडणार नवे उद्योजक!

सध्याचा सगळ्यात मोठा प्रश्न कुठला? असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे रोजगार निर्मिती. मात्र हे काम सोपं नाही.

१० वर्षांपूर्वी देआसरा फाउंडेशनने याच आव्हानात्मक प्रश्नावर काम करण्याचा निर्णय घेतला आणि जोमाने प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली.

यामागे प्रेरणा होते पर्सिस्टंट फाउंडेशनचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे. देआसराने नुकताच ३ लाख लोकांना आपल्या सोबत जोडण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठलाय.

काम अजून खूप मोठं आहे, त्यासाठी देआसराने ‘मिशन १ मिलियन’चं टार्गेट ठेवलंय.

काय आहे हे मिशन? कसं गाठणार उद्दीष्ट? कसे घडवणार उद्योजक? याच विषयी सांगताहेत देआसराच्या सीईओ प्रज्ञा गोडबोले या खास पॉडकास्टमध्ये.

फक्त ऐकून शांत बसू नका, या, देआसराच्या मिशनमध्ये सहभागी व्हा!