Search

व्यवसाय वाढवायचा? जास्त ग्राहक मिळवायचे? तर सोशल मीडिया मार्केटिंग शिवाय पर्याय नाही

  • Share this:
लॉकडाउनचा काळ आठवला तरी अंगावर काटा येतो. सगळं ठप्प होतं. त्यावेळी संपर्कासाठी आधार होता तो फक्त सोशल मीडियाचा. तेव्हा दुकाने बंद होती पण Online व्यवहार सुरू होते. हे डिजिटल मित्र मदतीला धावून आल्यामुळे सगळ्यांनाच दिलासा मिळाला. अनेक व्यवसाय जिवंत राहिले ते केवळ आणि केवळ सोशल मीडियामुळेच हे मान्यच केलं पाहिजे.
 

दहा वर्षांपूर्वी सोशल मीडियाचा वापर व्यवसाय वाढविण्यासाठी होऊ शकतो याचा विचार सुद्धा आपण करत नव्हतो. काही प्रगत देशांमध्ये अशा प्रकारचा वापर करण्यात येत होता. पण आता Instagram, YouTube आणि Facebook शिवाय कल्पनाही करवत नाही. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून व्यवसाय वाढू शकतो, ग्राहकांपर्यंत कमी पैशांमध्ये लवकर पोहोचता येतं हे आता सिद्ध झालंय.
 

अफाट वेग आणि प्रभाव यामुळे सोशल मीडियाला टाळणे आता अशक्य आहे. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे लाखो कोट्यवधींचा मल्टिनॅशनल ब्रँड असो किंवा अगदी छोटा व्यावसायिक सगळ्यांनाच या प्लॅटफॉर्म्सवर सारखीच संधी आहे.
 

जगभर सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या आहे ३.८ बिलियन. २०२५ पर्यंत हा आकडा ४.४१ बिलियन पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. भारतात सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या तब्बल ५० कोटींच्या आसपास आहे. या आकडेवारीवरून सोशल मीडियाची व्याप्ती आणि मार्केट आपल्या लक्षात येईल. तुमचा बिझनेस B2B असो की B2C सोशल मीडियाला टाळून आता तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही अशी आज स्थिती आहे. 

Local to Global
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरी बसून जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असलेल्या ग्राहकांशी तुम्ही थेट कनेक्ट होऊ शकता. ही प्रचंड मोठी संधी सोशल मीडियाने आपल्याला दिली आहे आणि त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे.

 
सोशल मीडिया मार्किटिंग म्हणजे काय? 
विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर (Facebook, LinkedIn, Twitter, Instagram इत्यादी) असलेल्या लोकांपर्यंत तुमच्या प्रॉडक्ट आणि सेवांबद्दल माहिती पोहोचवणं म्हणजेच सोशल मीडिया मार्केटिंग. ही माहिती देतांना ती आकर्षक पद्धतीने, ग्राहकाला आवडेल, रूचेल अशा अभिनव आणि रोचक पद्धतीने देणं अपेक्षीत आहे. लोक सोशल मीडियावर खूप वेळ घालवत असतात. त्यामुळे ते थेट उद्योजकांकडून वस्तू किंवा सेवा घेऊ शकतात. लोकांच्या मनात खरेदी करण्याची इच्छा निर्माण करणं म्हणजेच मार्केटिंग होय.

सोशल मीडियाच्या संदर्भात सगळ्यात चांगली गोष्टी म्हणजे, तिथे सगळ्यांना समान संधी आहे. तुम्हाला आवडेल, रूचेल, जमेल त्या भाषेत आणि प्रकारात तुम्ही तिथे माहिती देऊ शकता किंवा व्यक्त होऊ शकता. अनेकांना लिहीता येतं, पण बोलणं जमत नाही, काहींना बोलणं जमतं पण आकर्षक पद्धतीने लिहीता येत नाही. काहींना दोनही गोष्टी उत्तम जमतात. अशा सगळ्यांना तिथे संधी आहे. टेक्स्ट, व्हिडीओ, फोटो अशा सगळ्या माध्यमांचा वापर तुम्ही प्रभावीपणे करू शकता.

सोशल मीडिया मार्केटिंग का महत्त्वाचं आहे?
सोशल मीडियाबद्दल तुम्हीही कितीही बोला, पण एक गोष्ट मान्यच केली पाहिजे की कधी नव्हे तेवढं सोशल मीडियाने सर्व जगाला जवळ आणलंय. आत्तापर्यंत छोटे उद्योजक हे आपली मार्केटिंगची लढाई स्वत:च लढत होते. फोन करून कुणी चौकशी केली किंवा प्रत्यक्ष भेटायला येणारे ग्राहक एवढ्यापर्यंतच मर्यादीत त्यांचा संपर्क होता.
 

व्यवसाय वाढवायचा असेल तर वयक्तिक संपर्क अतिशय महत्त्वाचा असतो हे अनेक संशोधनामधून पुढं आलंय.
 

हीच गोष्ट सोशल मीडिया मार्केटिंगच्या माध्यमातून अत्यंत प्रभाविपणे करता येते. या माध्यमातून जास्तित जास्त लोकांशी कमी वेळात आणि कमी पैशांमध्ये तुम्ही प्रॉडक्ट आणि सेवेबद्दल माहिती देऊ शकता, त्यांच्याशी संपर्क करू शकता. तेही तुमच्याच स्टोरीचा भाग आहेत असं त्यांना वाटावं एवढ्या प्रभाविपणे हा संपर्क होऊ शकतो.
 

दुसरं महत्त्वाचं म्हणजे, त्यासाठी खूपच कमी असं बजेट लागतं. कमी पैशांमध्ये जास्त पोहोच वाढू शकते असं म्हटल्यावर, हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण ते अगदी खरं आहे. म्हणजे त्याचा दर्जा कमी असतो का? तर मुळीच नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रभाव निर्माण करणं हे पैशांवर नाही तर कल्पकतेवर अवलंबून आहे. तुम्ही किती वेगळ्या पद्धतीनं ते मांडता यावर त्याचा प्रभाव अवलंबून असतो.

काय आहेत सोशल मीडिया मार्केटिंगचे फायदे? 
कमी वेळात, किमान बजेटमध्ये जास्तित जास्त लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणं हीच सोशल मीडियाची ताकद आहे. ‘सोशल मीडिया’ ग्लॅमरमुळे आकर्षक वाटत असला तरी त्याचे असंख्य फायदे आहेत.
  • ग्राहकांना वस्तू किंवा सेवांबद्दल माहिती देणं आणि त्यांचा प्रतिसाद पाहून त्यांच्याशी नातं निर्माण करता येतं.
  • व्हिडीओ, फोटो आणि टेक्स्टच्या माध्यमातून प्रभाविपणे मार्केटिंग करण्याची सर्वोत्तम संधी.
  • तुम्हाला अपेक्षीत असलेले ग्राहक कुठल्या प्लॅटफॉर्म्सवर जास्त वेळ घालवतात ते शोधून त्यांना टार्गेट करता येतं.
  • सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही फक्त विक्रीच नाही तर तुमचा ‘ब्रँड’ही तयार करू शकता.
  • प्रॉडक्ट्स आणि सेवांबद्दल चर्चा घडवून आणू शकता. लोकांनी त्याबद्दल चर्चा करावी, बोलावं, प्रतिक्रिया द्यावी असं वाटत असेल तर यापेक्षा मोठा प्लॅटफॉर्म नाही.
  • ग्राहकांना नेमकं काय आवडतं, त्यांना काय वाटतं, त्यांचा कल, काय आवडत नाही अशा सर्व गोष्टींचा डेटा तुम्हाला यातून उपलब्ध होतो. व्यवसायाच्या वाढीसाठी आणि नियोजनासाठी हा डेटा खूप उपयोगी पडू शकतो.

कोविड आणि सोशल मीडिया 
कोविड काळात सर्व जगानेच सोशल मीडियाचा फायदा घेत ऐकमेकांशी संपर्क साधला. सगळेच घरात बंद असल्याने सोशल मीडियाच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. लोक व्यक्त होऊ लागले, संवाद साधू लागले. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसायही सुरू केला. लोकांच्या सवयी बदलल्या. त्यामुळे सोशल मीडिया हे माहिती मिळवण्याचं आणि पोहोचविण्याचं मुख्य साधन म्हणून पुढे आलं.

सोशल मीडिया मार्किटिंग करायचं कसं?
तुमच्या व्यवसायासाठी सोशल मीडिया मार्केटिंग करायचं असेल तर त्यासाठी दोन मार्ग आहेत. त्या माध्यमातून तुम्ही हे सुरू करू शकता. 

स्वत:च सुरुवात करा – तुमच्याकडे वेळ असेल, सोशल मीडिया कसा चालतो याचं पुरेचं ज्ञान असेल तर तुम्हीच कंटेट तयार करु शकता. सोशल मीडियावर पारंपरिक मार्गाने गेलात तर त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. प्रत्येक जण काही कंटेट तयार करण्यातला तज्ज्ञ नसतो. त्यामुळे स्वत:ला मर्यादा येतात आणि व्यवसायातून तेवढा वेळही अनेक जण काढू शकत नाहीत.

चांगल्या अनुभवी एजन्सीची मदत घ्या – व्यवसाय करताना कंटेंट तयार करून तो सोशल मीडियावर टाकणं आणि त्याचं मॉनिटरिंग करणं हे कौशल्याचं काम आहे. यासाठी प्रत्येकाकडे वेळ असेलच असं नाही. त्यामुळे चांगल्या एजन्सीची मदत घेणं हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे. अशा एजन्सीकडे अनुभवी तज्ज्ञांची एक टीम असते. ती मंडली ट्रेन्ड्स लक्षात घेऊन त्या प्रमाणात कंटेंट तयार करतात. त्याचा प्रभाव हा जास्त असतो. त्यामुळे तुम्हाला आवश्यक टार्गेट ग्रुपपर्यंत पोहण्यासाठी नियोजन, नव्या आयडिया आणि त्याची अंमलबजावणी करणं ही सगळी कामे या एजन्सी उत्तमपणे करत असतात छोट्या व्यावसायिकांसाठी काम करणाऱ्या deAsra Foundationने त्यासाठी एक खास सेवा सुरू केलीय.  deAsra ची upGrowth ही पार्टनर कंपनी त्यासाठी मदत करते. deAsraच्या या सेवेचा लाभ घेत अनेक छोट्या उद्योजकांनी आपला व्यवसाय वाढवला आहे.

deAsraआणि upGrowth ने छोट्या व्यवसायांसाठी मार्केटिंगचे काही पॅकेजेस तयार केले आहेत. ज्यांनी नुकताच व्यवसाय सुरु केलाय, ज्यांचा अजुनही सोशल मीडियावर प्रेझेंस नाही असे व्यवसाय आणि ज्यांचा प्रेझेंस आहे मात्र त्यांना तो वाढवायचा आहे अशा सगळ्यांसाठी वेगवेगळी पॅकेजेस deAsraने तयार केली आहेत. प्रत्येकाच्या गरजा आणि त्यांचं उद्दीष्ट लक्षात घेऊन त्या व्यवसायासाठी पॅकेजेस सुचवली जातात. 

Online starter package- यात तुमचा व्यवसाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आणला जातो. त्यामुळे तुमचं ब्रँडिंग होतं आणि मोठ्या ग्राहकसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. त्याबद्दलची अधिक माहिती इथे मिळेल. Learn More

Social Media Management – सोशल मीडिया मॅनेजमेंट सर्व्हिस (१ महिन्यासाठी) आणि पॅकेज( ३ महिन्यांसाठी) दिलं जातं. यात सोशल मीडिया एक्स्पर्ट मदत करतात. अनुभवी व्यक्तीकडून तुमचं सोशल मीडिया अकाउंट हाताळलं जातं आणि जास्तित जास्त लोकांपर्यंत तुमच्या प्रॉडक्टची माहिती पोहोचवली जाते. अधिक माहितीसाठी इथे मिळेल Learn more

सध्याचा काळ हा ब्रँडिंग आणि मार्केटिंगचा आहे. हे गणित ज्याला जमतं तोच व्यवसायात पुढे जातो हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे या गोष्टींना टाळून आपल्याला पुढे जाताच येणार नाही. 


साहिल खरे
Social Media Expart, upGrowth