माझी आई आंब्याचे लोणचं फार उत्कृष्ट बनवते, त्याचा व्यवसाय करता येईल का? त्यासाठी Sales and Marketing Strategies कशा असाव्यात? Export करू शकतो का? Digital Marketing, e commerce ची जोड त्याला कशी द्यावी? आमच्या घरात कुणीही व्यवसाय केलेला नाही त्यामुळे धाडस होत नाही.
भगवान वाणे, शिरजापूर, ता. कन्नड जि. औरंगाबाद
प्रिय भगवान,
शेती बरोबर खाद्य व्यवसाय सुरू करणे ही स्वागतार्ह कल्पना आहे. पूरक व्यवसायामुळे आर्थिक बाजू भक्कम करण्यास निश्चित मदत होते आणि आपल्या आईच्या रूपाने एक सक्षम महिला उद्योजिका इतर महिलांना नक्कीच प्रेरणा देईल. आपण आपल्या आईच्या व्यावसायिक प्रवासात हातभार लावत आहात हे अभिनंदनीय आहे.
ताटात कितीही चांगले पदार्थ असले तरी लोणचं असल्याशीवाय त्याला चव येत नाही. त्यामुळे लोणचं प्रत्येकाला दररोज लागतं. जेवणात चव आणण्यासाठी लोणच्याचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे.
ग्राहक केंद्रस्थानी
गृहउद्योगाला थोडं व्यापक स्तरावर घेऊन जायचं असेल तर त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा ग्राहक कोण आहे हे आधी निश्चित करून घ्या. त्यानंतर त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं याचा आराखडा तयार करा आणि त्याचबरोबर पदार्थाची गुणवत्ता उत्तम कशी राहिल याची काळजी घ्या.
खाद्य व्यवसायात गुणवत्तेची अतिशय काळजी घ्यावी लागते. त्याचबरोबर पदार्थ हे नाशवंत असल्याने त्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर या पदार्थांचा संबंध थेट आरोग्याशी असतो त्यामुळे जास्त काळजी घ्या. सध्या बाजारात अनेक प्रकारची लोणची मिळतात. त्या सगळ्यांमध्ये तुमचं लोणचं वेगळं कसं आहे हे तुम्हाला दाखवून देता आलं पाहिजे.
चवीकडे लक्ष द्या
आपल्याकडे प्रत्येक गावाप्रमाणं किंवा विभागाप्रमाणं चव बदलत असते. तुमच्या भागात जी चव आवडेल तीच चव इतरांना आवडेल की नाही हे सांगता येत नाही. गृहउद्योगाला व्यावसायिक रूप देताना याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. त्याचबरोबर काही आहारतज्ज्ञांशी बोलून लोणचं जास्त आरोग्यदायक कसं होईल याचीही काळजी घ्या.
उत्तम पॅकेजिंग
लोणच्यांमध्ये जास्त प्रमाणात तेल आणि मिठाचा वापर केला जातो. सध्या सगळेच लोक Health conscious झाले आहेत. त्यामुळे त्यादृष्टीनेही जास्त काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे पॅकेजिंग कसं होतं त्यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. आकर्षक पॅकेजिंग असेल तर जास्त लोक या पदार्थांकडे आकर्षित होतील.
जेव्हा व्यवसायाला गती येईल तेव्हा नक्कीच तू निर्यासाठीसुद्धा प्रयत्न करू शकतोस. त्याचा अभ्यास करून आराखडा तयार कर. कारण प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळे नियम असतात. त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घेतला पाहिजे.
पदार्थाचं मार्केटिंग कसं करावं, व्यवसाय वाढवण्यासाठी सोशल मीडियावर कसं फोकस करायचं यावर deAsra फाउंडेशन अनेक कार्यक्रम करत असतं. त्या त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ मार्गदर्शन करत असतात. अशा कार्यक्रमाच्या Links खाली देत आहे. त्याचाही तुला नक्कीच फायदा होईल.
Notice: This site uses cookies to provide necessary website functionality, improve your experience and analyze our traffic. By using our website, you agree to our legal policies.