मराठी माणूस यशस्वी होण्याचा विचार करतो तेव्हा तो उत्तमातील उत्तम नोकरी करण्याचाच विचार करत असतो. एखादा मोठा उद्योग किंवा व्यवसाय करून श्रीमंत व्हावे असा विचार फार थोड्या जणांच्या मनात येतो. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी आयुष्याची पाच सहा वर्षे घालवणा-या तरूणांना श्रीमंत होण्यासाठी उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण घ्यावे असे वाटत नाही. परदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुलांना पाठवणारे पालक आपल्या मुलांना भांडवल पुरवून व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देत नाहीत. मुळात उद्योजक होण्यासाठीही अभ्यास करावा लागतो हेच आपल्याकडे सांगितले जात नाही. नोकरी मिळत नाही म्हणून उद्योग सुरू करतो, अशा नकारात्मक पायावर उभारलेला उद्योग उभारी कशी धरणार?
भविष्याचा वेध घेऊन उद्योग कसे उभारावेत याची माहिती देणारी पुस्तके हवीत
बिल गेटस सारखा जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती सातत्याने पुस्तके वाचते व दरवर्षी आवडत्या पुस्तकांची यादी जाहीर करते. विकसित देशात महिन्याला सरासरी चार पुस्तके वाचण्याचे प्रमाण आहे. भारतात सरासरी फक्त एक पुस्तक वाचले जाते. मराठी साहित्यातही उद्योजकता विषयावरची पुस्तके कमी आहेत. मराठीत वाचल्या जाणा-या कथा, कादंब-यांतही इतिहासातील वैभव आणि त्यागाच्या कथा सांगितल्या जातात. वर्तमानातील किंवा भविष्याचा वेध घेऊन उद्योग कसे उभारावेत याची माहिती देणारी पुस्तके मराठीत कमी आहेत. यातील बरीच पुस्तके इंग्रजीतून मराठीत भाषांतरीत झाली आहेत.
उद्योजक व्हायचे असेल तर पैसे कसे काम करतात याचं शिक्षण घेणं आवश्यक
गेल्या काही वर्षात मात्र परिस्थिती थोडी बदलताना दिसते आहे. स्टार्टअपची संस्कृती यायला लागली आहे. यशस्वी मराठी उद्योजकांच्या कथा लिहिल्या व सांगितल्या जाऊ लागल्या आहेत. श्रीमंत होण्याला आणि पैसे मिळवण्याला प्रतिष्ठा मिळू लागली आहे. उद्योग कोणताही असो, उद्योजकाची मुख्य प्रेरणा ही लोकांच्या गरजा भागवून उत्तम व्यवहाराने श्रीमंत व्हावे अशी असते. उद्योजक व्हायचे असेल तर प्रथम पैसे कसे काम करतात याचे शिक्षण घेणे आणि पैशांबद्दलची नकारात्मकता घालवणे गरजेचे ठरते. याचे उत्तम शिक्षण देणारे आणि फक्त मराठीतच नव्हे तर जगातील अनेक भाषांत अतिशय गाजलेले श्रीमंत होण्याबद्दल माहिती देणारे पुस्तक म्हणजे रॉबर्ट किओसाकी यांनी लिहिलेले रिच डॅड आणि पुअर डॅड !
हे पुस्तक खूप गाजलं याचं कारण या पुस्तकाची रचना ! या पुस्तकात रिच डॅड आणि पुअर डॅड या दोन वडिलांची गोष्ट सांगितली आहे. दोघेही शिक्षणाला महत्व देतात पण एक डॅड खूप शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवणे आणि आर्थिक सुरक्षितता महत्वाची मानतात व गुलामगिरी स्विकारतात तर दुसरे रिच डॅड सांगतात की श्रीमंत होण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहेच. लोभ आणि भिती यावर मात करून श्रीमंत होण्यासाठी काय करायचे यासाठी पैसा म्हणजे काय हे शिकले पाहिजे.
या पुस्तकात रिच डॅड मुलांना सहा धडे शिकवतात. त्यातील पहिला धडा म्हणजे श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत तर श्रीमंत लोकांना पैसा आपल्यासाठी काम करावंस वाटतं....! त्यासाठी ते पहिल्यांदा विनामूल्य काम करायला सांगतात. पैसे मिळवण्याची भिती आणि मोह यांच्यावर मात करून पैसे आपल्यासाठी कसे काम करतात याचा विचार करायला शिकवतात. पैसे मिळवण्यासाठी कल्पकता कशी वापरतात याचा विचार करायला शिकवले जाते.
अकांउटिंगसारखा विषय शिकणे श्रीमंत होण्यासाठी महत्वाचे असते
दुस-या धड्यात अर्थ साक्षरतेचे महत्व रिच डॅड सांगतो. आर्थिक साक्षरता नसेल तर मिळवलेला पैसा वेगाने संपण्याची शक्यता असते. पैसा मिळवण्याइतकेच तो साठवणे आणि योग्य प्रकारे गुंतवणे यालाही महत्व आहे. महागाईच्या दरापेक्षा आपल्या गुंतवणूकीवरचा परतावा जास्त असेल तरच श्रीमंत होता येते. त्यासाठी ॲसेट आणि लायब्लिटी म्हणजे काय याची अर्थ साक्षरता महत्वाची ठरते. अकांउटिंगसारखा सगळ्यात कंटाळवाणा विषय शिकणे श्रीमंत होण्यासाठी महत्वाचे असते. मालमत्ता आणि कर्ज यातील फरक नीट समजून घेणे गरजेचे असते. आपले स्वतःचे घर ही कर्ज मालमत्ता नसते तर कर्ज असते हे रिच डॅड समजून सांगतात. मोठे घर म्हणजे मोठा ख्रर्च व मोठे आयुष्यभराचे कर्ज असते व अन्य ख्रर्चासाठी पैसेच उरत नाहीत. योग्य प्रकारे आकडे वाचणे, त्यांचा अर्थ लावणे, शिकणे, श्रीमंत होणे महत्वाचे असते.
अनेक लोक व्यवसाय उद्योग करतात. पैसेही मिळवतात पण ते सांभाळता येतही नाही. कॅश फ्लो म्हणजे काय तो कसा सांभाळायचा याची माहिती घेणे गरजेचे असते.
रिच डॅड म्हणत की बुद्धिमान माणसे नेहमी आपल्यापेक्षा बुद्धिमान माणसांना नोकरीवर ठेवतात, आणि त्यातून आपला उद्योग उभारतात. शाळा हे उत्तम कर्मचारी निर्माण करतात पण तिथे उद्योजक निर्माण होत नाहीत. पैसे महत्वाचे नाहीत असे पुअर डॅड म्हणतात तर पैसे मिळतात कसे हे शिकणे महत्वाचे असते.
आपला खरा व्यवसाय ओळखा
तिसरा धड्यात कोवासकी सांगतो की तुमचा उद्योग ओळखा. याचे उदाहरण म्हणून ते मॅकेडोनाल्डचं उदाहरण देतात. मॅकेडोनाल्डचा खरा उद्योग रिअल इस्टेटचा आहे. उत्तम लोकेशन हा उद्योग आहे, कारण त्यांची फ्रॅँचाइझी घेणार्या व्यक्ती मॅकडोनाल्डसाठी मोक्याच्या जागेत गुंतवणूक करतात व त्यावर मॅकडोनाल्ड कंपनी पैसे मिळवते. तसा आपला खरा व्यवसाय ओळखा. चौथ्या धड्यात कोवासकी सांगतात श्रीमंतांकडून कर घेऊन गरीबांना सेवा पुरवावी ही रॉबीनहूड थिअरी सर्वांना आकर्षक वाटते पण प्रत्यक्षात गरीब आणि मध्यमवर्गीय, विशेषतः उच्च मध्यमवर्गीय लोक कर जास्त भरतात आणि श्रीमंत लोक कर भरत नाहीत. श्रीमंतांनी त्यासाठी कॉर्पोरेशन्सची स्थापना केली आणि त्यातून कर वाचवायला सुरूवात केली. सामान्य नोकरदार माणूस आयकरापोटी तीन महिने सरकारसाठी काम करतो. खर्चावरचा अप्रत्यक्ष कर भरून जवळजवळ पाच ते सहा महिने सरकारसाठी काम करतात. पण श्रीमंत लोक कंपन्यांच्या मार्फत सर्व खर्च करतात व कर वाचवतात हे सांगून श्रीमंत लोक पैसे कसे निर्माण करतात. बाजारपेठ म्हणजे काय ते शिकणे आणि मागणी आणि पुरवठा म्हणजे काय हे समजणेही महत्वाचे असते. अकाऊंटिंग, गुंतवणूक आणि बाजारपेठ यांच्या भोवती सर्व पैसे फिरतात. कॉर्पोरेशनला मिळणा-या करसवलतींचा कायदेशीर उपयोग करतात.
पैशांसाठी नाही तर शिकण्यासाठी काम करत राहिलात तर काळाच्या पुढे रहाल
संकल्पना, धैर्य, धाडस आणि आत्मविश्वास हे श्रीमंत होण्यासाठी महत्वाचे असते. अनेकदा हुशार मुले मागे पडतात आणि धाडसी पुढे जातात हे लक्षात येते. शेवटी श्रीमंत का व्हायचे तर श्रीमंतांना निवडीचे सामर्थ्य मिळते असे सांगून कोवासकी सांगतात की सध्याचा काळ हा तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्य लोकांनाही आर्थिक बुध्यांक वाढवून श्रीमंत होण्यासाठी उत्तम आहे. माहिती हीच संपत्ती आहे हे ओळखले पाहिजे. शेवटी तुम्ही पैशांसाठी काम करत राहिलात तर श्रीमंत होण्याची शक्यता कमी असते. पण तुम्ही शिकण्यासाठी काम करत राहिलात तर नेहमी काळाच्या पुढे रहाल. म्हणून श्रीमंत होण्यासाठी सतत नवे शिकण्यासाठी काम करत राहिले पाहिजे. श्रीमंत होण्यासाठी मला जगभर फिरण्याचे स्वातंत्र्य हवे आहे, मला उत्तम जीवनशैली हवी आहे व ती तरूण वयातच मिळवायची आहे, माझ्या आयुष्यावर व माझ्या वेळेवर माझाच ताबा हवा अशी तुमची काही खास कारणे असतील तर ती अंतःप्रेरणा मिळते आणि आपल्या जीवनात आर्थिक स्वातंत्र्य मिळवता येते असे रॉबर्ट टी टी. कोयासाकी सांगतो. उद्योजक होण्यासाठी म्हणूनच आंतरिक प्रेरणा महत्वाची ठरते व ती जागृत करण्यासाठी पुस्तकांशी मैत्री महत्वाची आहे.
व्यवसायाचं नियोजन सुरू असताना आपली बिझनेस आयडिया खरच व्यावहारिक आहे की नाही हे तपासणं महत्वाचं आहे. यासाठीdeAsraफाउंडेशनचीIDEA VALIDATIONही सेवा तुम्हाला फायद्याची ठरू शकते.
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्हीdeAsraसोबतसंपर्ककरू शकता.
Notice: This site uses cookies to provide necessary website functionality, improve your experience and analyze our traffic. By using our website, you agree to our legal policies.