Search

Ask Anand: व्यवसायासाठी कर्ज किती घ्यावं, याचं काही प्रमाण असतं का?

सर,  जळगावमध्ये माझा वेफर्सचा व्यवसाय आहे. केळ्यांचे उत्तम दर्जाचे वेफर्स करून मी होलसेल विकतो. गेल्या पाच वर्षांपासून मी हा व्यवसाय करतो. पहिल्या वर्षापासून मी बँकेचे व्यवहार चोख ठेवले आहेत. त्याचबरोबर रिटर्न्स फाईल केले आहेत. व्यवसायासाठी लागणारे सर्व परवाने माझ्याकडे आहेत. मला आता व्यवसाय वाढवायचा असून वेफर्स तयार करणारं मशिन विकत घ्यायचं आहे. त्यासाठी बँकेकडून कर्ज हवं आहे. व्यवसायात कर्ज किती घ्यावं, त्याचं काही प्रमाण असतं का?
प्रविण जगताप, जळगाव


प्रिय प्रविण,
जळगावमध्ये केळ्याचे वेफर्स करण्याचा व्यवसाय गेली पाच वर्षे करत आहेस याबद्दल अभिनंदन. व्यवसाय किफायतशीरपणे करताना, सर्व परवाने व जमाखर्चाच्या नोंदीचोख ठेवून, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत आहात ही महत्त्वाची गोष्ट आहे.व्यवसायाचे सर्व व्यवहार आपल्या बँक अकाउंट तर्फे होत आहेत ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. व्यवसाय वाढीसाठी आपण वेफर्स तयार करण्याचे मशीन घेताना त्या मशीनरीची तुलनात्मक किंमत, इन्स्टॉलड/ मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी किती आहे,मॅन्युफॅक्चरर/ सप्लायर रेप्यूटेड आहे ना, तसेच भविष्यात मशिनरी रिपेअर ची गरज लागल्यास त्वरित सोय उपलब्ध आहे का या गोष्टींबाबत विचार विनिमय/खात्री करून घ्यावी.
केळाच्या वेफर्स मशीन बरोबरच आवश्यकता असेल तर पॅकिंग व सिलिंग ची कॅपॅसिटी योग्य आहे ना हेही पाहावं. तसेच आवश्यक तो (पावर लोड) वीज पुरवठा सतत उपलब्ध राहील याच्या बद्दलही खात्री करून घ्यावी.या सर्व मशीन्स चे जीएसटी धरून असलेले कोटेशन घेऊन काही प्रमाणात बुकिंग साठी म्हणून ॲडव्हान्स तुम्हाला द्यावा लागेल.

हा मशिनरी खर्च भांडवली खर्च (कॅपिटल एक्सपेंडीचर) म्हणून व्यवसायाच्या जमाखर्चात दाखवला जातो.तुमच्या सध्याच्या बँकेकडे तुम्हाला मशीनरी साठी दीर्घ मुदतीचे कर्जासाठी चा अर्ज करावा लागेल.बँकेकडून सरासरी मशिनरी किमतीच्या 75 टक्के दीर्घ मुदतीचे कर्ज मिळू शकते. म्हणजेच पंचवीस टक्के पैसे मार्जिन म्हणून तुम्हाला गुंतवावे लागतील. यासाठी तुम्हाला 31 मार्च 23 ची बॅलन्स शीट व इतर फिनान्शियल स्टेटमेंट तयार करून घ्यावी लागतीलच.

तसेच व्यवसायाची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढल्यामुळे, खेळते भांडवलाचीसुद्धा आवश्यकता भासेल व त्यासाठी बँके कडून तुम्हाला कॅश क्रेडिट लिमिट ही मिळू शकेल. कॅश क्रेडिट ची रक्कम ही तुमच्या खेळत्या भांडवल ची गरज व लेटेस्ट मार्च 23 बॅलन्स शीटचा अभ्यास करूनठरवता येईल.

अशा दोन्ही कर्जासाठी अर्ज करताना प्रोजेक्ट रिपोर्ट, मागील दोन वर्षाची बॅलन्स शीटस व इतर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बँकेत द्यावी लागतील.

तसेच बँका किंवा वित्तीय संस्थांमध्येकर्ज मंजूर करताना(CIBIL)सिबिल स्कोर ला महत्त्व आहे आपला सिबिल स्कोर 750 ते रेंजमध्ये असेल तर कर्ज मिळणे सोयीचे जाते सिबिल स्कोर हा तुमची क्रेडिट हिस्टरी म्हणजेच कर्ज परतफेडीची माहिती व क्षमता दर्शवतो.

देआसरा फाउंडेशन कडून आपणास प्रोजेक्ट रिपोर्ट ही सेवा घेता येऊ शकेल. यासाठी आपण आमच्या वेबसाईट वरून संपर्क साधू शकालबँकर तुमचे लोन प्रपोजल तपासून बिझनेस viability जज करून मगच, मंजूर केलेले कर्ज हे नेमून दिलेल्या वेळेत परतफेड होईल यासाठी तुमचा सविस्तर इंटरव्यू घेतो. आपली एज्युकेशनल व फॅमिली बॅकग्राऊंड, व्यवसायातील अनुभव, कॉम्पिटिशन मार्केट स्टडी, तुमची मेहनत करण्याची तयारी व इतर बलस्थाने याचा मागोवा बँकर घेतो.
व्यवसायाचे ठिकाणी कर्ज मंजूरपूर्व व्हिजिट ही करतो. अशा इंटरव्ह्यू मध्ये बँकरचा विश्वास संपादन करणे सुद्धा आवश्यक आहे.  deAsra फाउंडेशन तर्फे आपणास विशेष मार्गदर्शन "बिझनेस लोन सारथी" अंतर्गत मिळू शकते त्याचाही आपण लाभ घेऊ शकता या सगळ्या प्रोसेस मध्ये  deAsra फाउंडेशन तुमच्या मदतीसाठी कायम तत्पर आहे.

खूप खूप शुभेच्छा

आनंद
https://twitter.com/anandesh
https://www.linkedin.com/in/ananddeshpande/