क्वालिटी, इनोव्हेशन आणि पर्सिस्टंन्स या गुणांच्या जोरावर ‘लोकल’ व्यवसाय ‘ग्लोबल’ करता येतो. हे AgroZee Organics Pvt. Ltd च्या महेश लोंढे यांनी दाखवून दिलंय. महेश यांनी २ वर्षांपूर्वी ही AgroZee कंपनी स्थापन करून व्यवसायाला सुरूवात केली. काय करते ही कंपनी? तर मिलेट प्रॉडक्ट्स (भरडधान्ये) म्हणजे नाचणी, राळा, वरई, भगर, सावा, बाजरी, ज्वारी या धान्याचा वापर करून लाडू बिस्किटे याशिवाय अनेक पौष्टिक पदार्थ बनवते. हे सर्व पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आणि अपाय न होणारे आहेत. डायबेटिस, कुपोषण या सर्वांसाठी हे पदार्थ चांगला पर्याय ठरत आहेत. याचबरोबर AgroZee चे सर्व प्रॉडक्ट्स हे भरपूर जीवनसत्व आणि ग्लूटेन फ्री आहेत. त्यामुळे विशिष्ट डाएट करणारी लोकंही हे लाडू किंवा बिस्किटे निर्धास्तपणे खाऊ शकतात.
सगळं जग कोविडशी लढत असताना इम्युनिटी वाढवण्याचा सल्ला डॉक्टर्स देत होते. महेश यांना ही मोठी संधी दिसली. त्यांच्या सर्व प्रॉडक्ट्समध्ये मैदा किंवा इतर preservatives वापरले जात नाहीत. त्यात नैसर्गिक घटकच असल्याने आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरले. संशोधनाची जोड देत लोकांना त्यांनी त्याचं महत्त्व पटवून दिलं. हाच त्यांच्या व्यवसायाचा टर्निंग पॉईंट ठरला आणि कमी वेळात त्यांच्या उद्योगाने उंच झेप घेतली.
शिक्षकी कुटुंबात वाढलेले महेश यांनी व्यवसायत येण्याच विचार केला यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे, त्यांची आई. त्यांची आई डायबेटिक पेशंट आहे. तिच्या खाण्यावर आलेली बंधन आणि त्यामुळे काही इतर गरजेची मूल्य आईला कशी मिळतील या विचारातून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. millet based product वर संशोधानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. AgroZee हे शेतकऱ्यांना विशिष्ट जातींची बियाणे देते आणि त्यापासून तयार झालेले धान्य विकत घेते. यानी उत्पादनाची क्वालिटी एकसारखी राहण्यास मदत होतेच पण या धान्यातील पोषणमूल्यही तीच राहतात. AgroZee हे मागणीनुसार पुरवठा करते. ताजे आणि सकस पदार्थ ग्राहकाला देण्यावर त्यांचा भर असतो. कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह्स वापरत नसल्यामुळे पदार्थाचा शेल्फ लाईफ हे मर्यादित आहे. त्यामुळेच ऑर्डर घेऊन मगच प्रॉडक्ट बनवले जातात.
सध्य AgroZee मध्ये १० ते १२ कर्मचारी काम करत असून पुढील काळात जास्तीत जास्त लोकांना रोजगार देण्यावर महेश यांचा विचार आहे. २५ ते ३० लाखांची गुंतवणूक त्यांनी आजपर्यंत केली आहे. भरडधान्यांपासून ८० ते ९० पदार्थ ते सध्या बनवत आहेत.
'देआसरा' चा महत्वाचा वाटा
फेसबुकवर पाहण्यात आलेल्या पोस्ट वरून महेश यांना दे आसराविषयी आणि त्यांच्या पुरस्कारसंबिधित माहिती मिळाली. आपसूकच ते उत्सुकतेनी वेबसाईटवर गेले आणि त्यांना अनेक प्रकारची माहिती तिथे मिळाली. पुरस्कारासाठी त्यांनी अर्ज तर भरलाच पण दे आसराच्या अनेक वर्कशॉप्स, सेमिनार्सना ते सहभागी झाले. ज्याचा फायदा त्यांना अनेक प्रकारे व्यवसाय करताना होतो आहे. डिजीटल मार्केटिंग, निर्यात, लायसन्सिंग, या सारखे अनेक बाबतीमध्ये दे आसराची त्यांना मदत झाली हे ते आवर्जून सांगतात.
जी व्यक्ती नव्यानी उद्योगात येऊ इच्छिते त्यांनी दे आसरामध्ये नक्की जावे असं ते आवर्जून सांगतात.
Notice: This site uses cookies to provide necessary website functionality, improve your experience and analyze our traffic. By using our website, you agree to our legal policies.