Search

अशी बनली आईस्क्रीम सॉफ्टी ते ‘डेअरी डॉन आईस्क्रीम’ चेन

ही गोष्ट आहे साधारपणे १९८९ ची. सुभाष आणि राजेंद्र येवला एका ट्रेड फेअरच्या निमित्ताने दिल्लीला गेले होते. ते मूळचे नाशिकच्या सटाणा तालुक्याचे रहिवासी आहेत. घरात वडील डी डी येवला यांचा पेट्रोलियमचा व्यवसाय होता. त्यामुळे बिझनेस याच उद्देशाने ते ट्रेड फेअर बघण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा त्यांनी आईस्क्रीम सॉफ्टी हा प्रकार पाहिला. लगेचच तो खाऊनही बघितला. हे काही तरी वेगळे आहे. याचा व्यवसाय करता येईल असा विचार डोक्यात चमकला आणि थेट कामाला सुरुवात झाली.      

  
सुरुवातीला संशोधन करत काम सुरु केले. वेगवेगळ्या प्रकारे आईस्क्रीम बनवून बघितले. सोबतच सॉफ्टीसाठी आवश्यक असलेले मशीन विकत घेतले. ते मशीन इटालियन होते. ते वापरायचे कसे याचे आधी धडे गिरवले. प्रसंगी नुकसानही झाले. शेवटी १९९१ मध्ये नाशिकमधील एम जी रोडवर असलेल्या दुकानात उत्तर महाराष्ट्रतले किंबहुना महाराष्ट्र पहिले आईस्क्रीम सॉफ्टीचे दुकान ‘डेअरी डॉन’ हे सुरु झाले. त्यावेळी सॉफ्टी स्वरूपात आईस्क्रीम ही कल्पनाच खूप वेगळी आणि नवीन होती. तेव्हा आईस्क्रीम म्हटले की वाटीत घेऊन खायचे असेच चित्र होते. त्यामुळे सुरुवातीला लोकांमध्ये उत्सुकता होती. सोबतच काही प्रमाणात भीती सुद्धा होती. आईस्क्रीम सॉफ्टी सोबतच ‘सेल्फ सर्व्हिस’ हा प्रकार सुद्धा नवीनच होता. मात्र उत्तम चव असल्यामुळे बघता बघता डेअरी डॉनला आईस्क्रीमप्रेमींनी आपलेसे केले. सुरुवातीला व्हॅनिला, मँगो, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी या चारच स्वादांची आईस्क्रीम सॉफ्टी सुरु केली. १९९६ मध्ये शाखा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. शहर विकासाचा आढावा घेत कॉलेज रोड परिसरात शाखा सुरु केली.    

पुढे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र व्यवसायात स्पर्धाही वाढत होती. त्यामुळे सातत्याने नवीन काही तसे देणे आवश्यक होते. त्यासाठी स्वतःची लॅब असणे गरजेचे असल्याचे जाणवले. त्यामुळे स्वतःची लॅब उभी केली. सोबतच व्यवसाय विकासाची गरज ओळखून पुढची पिढी देखील व्यवसायात सक्रीय झाली. त्यामुळे अधिक बळ मिळाले. व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यात आईस्क्रीम पार्लर हे कल्पना मांडून यशस्वी केली. अर्थात ही संकल्पनाही पहिले त्यांनीच आणली. सोबतच नवनवीन चवीचे आईस्क्रीम, थिक शेक, मस्तानी, कॅन्डी बनवायला सुरुवात केली. सोबतच ‘डेअरी डॉन’ फ्रँचायझिंग ही सुरु केले.  

असे आहे फ्रँचायझी मॉडेल
डेअरी डॉन नेहमी एकल लोकांना फ्रँचायझी देते. यात सर्व गोष्टी या डेअरी डॉनकडून पुरवल्या जातात. मागणी आणि क्षमता यानुसार काही बदल केला जातो. जागेची गुंतवणूक ही फ्रँचायझीदाराला करावी लागते. आतापर्यंत नाशिकसह पुणे, मालेगाव,  मुंबई, धुळे, जळगाव, शिर्डी, नागपूर याठिकाणी फ्रँचायझी दिलेली आहे. सोबतच लवकरच संपूर्ण भारतामध्ये विस्ताराचे नियोजन आहे.
डेअरी डॉन आईस्क्रीममध्ये हे मिळते
सध्या आईस्क्रीम, थिक शेक, मस्तानी, कॅन्डी, कसाटा आणि sundae सन्‌डे फल मिश्रित आईस्क्रीमचे उत्पादन केले जाते. यात पन्नासहून अधिक चवींचा समावेश आहे. 

डेअरी डॉनच्या या संपूर्ण वाटचाली विषयी बोलतांना चेतन येवला सांगतात, आज डेअरी डॉन आईस्क्रीम ब्रॅंड तयार झालेला दिसत असला तरी यामागे मोठी मेहनत आहे. संशोधन हा आमच्या व्यवसायाचा मुख्य कणा आहे. आम्ही संशोधनावर मेहनत, वेळ आणि पैसा खर्च करतो. यासाठी आम्हाला सतत अभ्यास करावा लागतो. देशाबरोबरच विदेशातल्याही तज्ज्ञांना सतत सल्ला घेत असतो. समजा एखादे नवीन आईस्क्रीम विदेशात दाखल झाले तर आपल्याकडे ते अगदी तसेच्या तसे बनवता येत नाही. भारतल्या लोकांची चव वेगळी आणि गोड अशा स्वरूपाची आहे. त्यामुळे विदेशातल्या आईस्क्रीममध्ये बरेच बदल करावे लागतात. मग तो बदल आम्ही करतो. संशोधनाचे हे काम आमच्याकडे सतत चालूच असते. साधारपणे वर्षाला १२ ते १८ प्रकारचे नवीन आईस्क्रीम आले तर त्यापैकी १० ते ११ आईस्क्रीम आम्ही बनवतो. पुढे संशोधन प्रक्रियेतून फक्त ४ प्रकारचे आईस्क्रीम ग्राहकापर्यत जातात. कुठलेही आईस्क्रीम बनवतांना सर्वात आधी आम्ही बदल करत करत शेवटी त्याचा एक फॉर्म्युला तयार करतो. दुध, साखर, इतर घटक यांचे प्रमाण ठरते. पुढे त्याच प्रमाणात आईस्क्रीम बनवले. त्यामुळे एकदा आईस्क्रीम तयार झाले की दरवेळी तिच चव मिळते.   

आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे दुध, साखर हे आम्ही स्थानिक बाजारपेठेतून घेतो. तर काही फळे, चॉकलेट आदी घटक विदेशातूनही येतात. यात इटली, बेल्जियमचा समावेश आहे. नाशिकमध्ये चांगल्या प्रतीचे दुध मिळत असल्यामुळे नक्कीच याचा फायदा होतो. आम्ही गरजेनुसार दुध स्थानिक बाजार पेठेतून घेतो. हंगामानुसार ही मागणी कमी जास्त होत असते. साधारपणे ३ ते ४ हजार लिटर दुधाची गरज असते. पुढे वाढ करत १० हजार लिटर पर्यत पोहोचण्याची आमची क्षमता असून त्या पद्धतीची मशीन आम्ही घेत आहोत. ही मशीन देखील देश आणि विदेशातील आहे. अगदी दुध गरम करण्यापासून सर्व कामे मशीनवरच होतात. यासाठी साधारणपणे ३० कारागिरांची मदत घेतली जाते. यात काही हंगामी कारागीर देखील आहेत. 
    
डेअरी डॉन आईस्क्रीम चेन चालवताना मी आणि भाऊ प्रणव हे उत्पादनाचे काम बघतात. तर अक्षय आणि तन्मय हे भाऊ वितरणाचे काम करत असल्याचे चेतन सांगतात. चवीविषयी ते सांगतात की, आम्ही नेहमी ग्राहकाला बेस्टच देतो. त्याबाबत कुठलीच तडजोड करत नाही. त्यामुळे ग्राहकांचे प्रेम आम्हाला मिळाले आहे. अनेक नामवंत लोकांनी आमच्या आईस्क्रीमचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे विदेशी लोकांनी देखील ‘डेअरी डॉन आईस्क्रीम’बेस्टच असल्याचे सांगितले असे चेतन स्पष्ट करतात.


हॉटेल व्यवसायाकरता लागणारे लायसन्सआणिरजिस्ट्रेशन याकरता deAsra फाउंडेशन सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.

रत्नदीप रणशूर

ratndeep28@gmail.com

पुढे जाण्यासाठी यशस्वी उद्योजक ला Login करा!